नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्याबहुतांश देशात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.
पुढीलवर्षी २३ जुलैला ऑलिम्पिक स्पर्धांचा उदघाटन सोहळा होईल आणि ८ ऑगस्ट २०२१ला समारोप सोहळा होईल.आयोजकांनी आज टोकियो इथं ही माहिती दिली.
युद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा यापूर्वीरद्द करण्यात आल्या होत्या मात्र स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे.