Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत

दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत

मुंबई : कोरोना  विषाणू महामारीमुळे  देशात लॉकडाऊन जारी  असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि इतर वस्तू पुरवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. आयआरसीटीसीने, मुंबई आणि अहमदाबाद स्थानकावरची बेस किचन, मुंबई आणि अहमदाबाद परिसरातल्या गरजू आणि गरिबांना मोठ्या प्रमाणात भोजन पुरवण्यासाठी सज्ज केली आहेत.

यासाठी पश्चिम  रेल्वेच्या विविध विभागातले  कर्मचारी स्वेच्छेने पुढे आले आहेत.आवश्यक ती खबरदारी आणि सुरक्षितता  आणि स्वच्छतेची काळजी  घेऊनच हे काम करण्यात येत आहे.

आयआरसीटीसीने रविवारी( मार्च29)ला मुंबई सेन्ट्रल इथल्या बेस किचन मधून डाळ खिचडी आणि लोणचे यांचा समावेश असलेली 1500 भोजन पॅकेट वितरणासाठी तयार केली तर आज 30 मार्चला मुंबई इथल्या बेस किचन मधून 2880 तर अहमदाबाद इथून 1037 भोजन पॅकेट वितरणासाठी तयार केली. स्वयंसेवी संस्था,रेल्वेचे वाणिज्यिक कर्मचारी आणि आरपीएफ यांच्या माध्यमातून गरजूंना वाटपासाठी ही   पॅकेट वितरीत करण्यात आली.

सलाम मुंबई,  रॉबिनहूड आर्मी, नन्ही कली या संस्थाना मुंबईतून भोजन वितरीत करण्यात आले.नन्ही कली या  संस्थेने केईएम रुग्णालय,टाटा रूग्णालयाच्या बाहेर आणि झोपडपट्टी विभागात या भोजनाचे वाटप केले.आयआरसीटीसी आणि आरपीएफ, येत्या दिवसातही आपली सामाजिक उत्तरदायित्व निभावणार असल्याची  माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यानी  स्वेच्छेने पुढाकार घेत स्वतः खर्च करून आपल्या परिसरातल्या गरजूंना  मदतीचा हात दिला आहे.

Exit mobile version