Site icon साप्ताहिक एकच ध्येय

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य संकट निर्माण, टाळाबंदी’मुळे आर्थिक उत्पन्नातही घट

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य संकट निर्माण झाले आहे, तसेच टाळाबंदी’मुळे आर्थिक उत्पन्नातही घट झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपातीचा निर्णय- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार, अशी माहिती वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिली.

‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के, तर ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात. मात्र, ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घेतला. असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार म्हणाले.

Exit mobile version