Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून भारती हॉस्‍पीटलच्‍या चमूचे कौतुक

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्‍टाफ यांच्‍या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथील भारती हॉस्‍पीटलमध्‍ये गेल्‍या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. ती व्‍हेंटीलेटरवर होती.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्‍या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून व्‍हेंटीलेटरवरुन काढून आयसीयूमध्‍ये तिला शिफ्ट करण्‍यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत, ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी कोरोना बाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनीही हॉस्‍पीटलचे अधिष्‍ठाता डॉ. संजय ललवाणी आणि त्‍यांच्‍या चमूचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे.

Exit mobile version