Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण  होत  आहे.  मुलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेली ‘शक्तिमान’ मालिका  डीडी नॅशनल या वाहिनीवर एप्रिलपासून रोज दुपारी 1.00 वाजता  प्रसारित  होणार आहे.
श्रीमान श्रीमती मालिका डीडी नॅशनलवर  रोज दुपारी दोन वाजता लागणार  आहे. ‘चाणक्य’ मालिका  आणि उपनिषद गंगा ही मालिकाही  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ‘डीडी भारती’या वाहिनीवर दुपारच्या वेळेत प्रसारित  होणार आहे.   कृष्णा काली  ही मालिका रोज रात्री 8.30 वाजता डीडी नॅशनलवरून प्रसारित होईल.
रामायण महाभारतसह काही लोकप्रिय मालिकांचं प्रसारण या आधीच सुरू करण्यात आलं आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायद्यानुसार देशभरातल्या सर्व डीटीएच केबलचालकांना दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्या दाखवणे  बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग केल्याचं  आढळल्यास कारवाई केली जाईल.
दूरदर्शनची कुठंली वाहिनी उपलब्ध नसल्यास  आपल्या जवळच्या दूरदर्शन केंद्रप्रमुखांकडे त्याची माहिती द्यावी. किंवा ddpb.inform@gmail.com  या ई-मेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी. असं  आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केलं आहे.
Exit mobile version