Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पावसाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी यंत्रणा कार्यरत – राज्यमंत्री योगेश सागर

मुंबई : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात पिण्यासाठी सुरळीत व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असल्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. सागर म्हणाले, दूषित व गढूळ पाण्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर लगेच पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी देण्यात यावे व त्यावर अल्गेच कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या बसविण्याचे काम महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित करण्यात आले आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य कपिल पाटील, अँँड राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर आणि  श्रीमती विद्या चव्हाण आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

Exit mobile version