नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लस आणि औषधांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. माणसामध्ये या लसीचा वापर करण्याआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला जातो.
आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ४४ लसींपैकी माणसांवर उपयुक्त अशा केवळ २ लसी आढळल्या असून त्यांच्या काही चाचण्या होणं अद्याप बाकीं आहे. यातल्या पहिल्या लसीची चाचणी अमेरीकेत सीएटल इथं होत असून दुसऱ्या लसीची चाचणी चीनच्या वूहान इथं तोंगजी रुग्णालयात होत आहे.