नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी वित्तमंत्र्यांना काही सूचना केल्या. शेतीच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची आणि रचनात्मक बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
आयात-निर्यात धोरणाचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणाबाबत आढावा घेण्याची सूचना नायडू यांनी केली.
आंध्र प्रदेशला विशेष साहाय्य सुरु ठेवण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनीही आज उपराष्ट्रपतींची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगभरात मिळालेल्या भरभरुन प्रतिसादाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. योग, लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरुच ठेवण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.