Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संचारबंदीच्या काळात सिलेंडरची मागणी वाढली तर पेट्रोल-डिझेलच्या मागणीमध्ये घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात राज्यात गॅस सिलेंडरच्या मागणीतून सुमारे २३ टक्के वाढ झाली आहे. सध्या दिवसाला ६ लाखाहून अधिक सिलिंडरची मागणी होते आहे.

पूर्वी हा आकडा पावणे पाच लाखापेक्षा कमी होता. पण या सर्व ग्राहकांना पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध असून ग्राहकांना मागणीनुसार सिलेंडर वितरीत केले जात असल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे. मात्र संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहने कमी प्रमाणात येत आहे. त्याचा मोठा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या मागणीवर झाला आहे.

पेट्रोल-डिझेलची मागणी सुमारे ६० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. पूर्वी राज्यातून दिवसाला सुमारे १ कोटी १० लाख लिटरहून अधिक पेट्रोलची मागणी होत होती. ही मागणी आता सुमारे ५१ लाख ५७ हजार लिटर पर्यंत कमी झाली आहे. तर पूर्वी राज्यात दिवसाला २ कोटी ३५ लाख लिटर डिझेलची मागणी व्हायची. आता ही मागणी ९७ लाख लिटरपर्यंत घसरली असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी कळविले आहे.

Exit mobile version