नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचणीसाठी आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे.
आता शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत चाचणीच काम नियमित सुरू होणार आहे. अशा प्रकारचे नमुने यापूर्वी पुण्यातल्या प्रयोग शाळेकडे पाठवली जात होती.
सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक राज्याल्या सीमेलगतच्या भागातल्या लोकांच्या नमुन्यांची चाचणी इथं केली जाणार आहे.
जालना जिल्हा रुग्णालयाजवळच्या इमारतीमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार केलं जात आहे.