नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं, संचारबंदीचा निर्णय अधिक कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केलं आहे.
नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर संचारबंदीचा कालावधी वाढवावा लागणार नाही. सध्या तरी चौदा तारखेपर्यंत नागरिकांनी संयम पाळावा, असं आवाहन पवार यांनी केलं.
खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे. आज रामनवमीचा सण नागरिक घरातच श्रीरामाचं स्मरण करून साजरा करत आहेत, पुढच्या आठवड्यात येणारा शब ए बारात तसंच येत्या चौदा तारखेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी घरी राहूनच साजरी करावी, असं आवाहन पवार यांनी केलं.
दिल्लीत निजामुद्दीन इथला कार्यक्रम व्हायला नको होता, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं