Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्र्यांनी केली पीएम-केअर्सची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अचानक उद्भवलेल्या कोविद-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नरेन्द्र मोदी यांनी पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन पीएम-केअर्स निधीत योगदान देता येईल.

पीएम-केअर्सचा खाते क्र 2121PM20202 असून SBIN0000691 याचा आय एफ एस सी कोड आहे, तर SBININBB104  हा स्विफ्ट कोड आहे. pmcares@sbi हा यु पी आय,आय डी आहे .

मुख्यमंत्री सहायता निधीतही मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याकरिता चीफ मिनिस्टर रिलीफ फंड कोविड १९ या नावानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट मुंबई इथल्या शाखेत खातं उघडण्यात आलं आहे. याचा खाते क्रमांक ३९२३९५९१७२० हा असून आय.एफ एस सी कोड SBIN0000300 हा आहे.

Exit mobile version