पिंपरी : शहरामध्ये सध्या पेटीएम, केवायसी अपडेट करावयाची आहे, असे सांगून Any Desk, Quick Support, Team Viewer अशा प्रकारचे मोबाईलचा ॲक्सेस घेणारे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून, आपल्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन आपली आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत.
अशा प्रकारचे अप्लिकेशन डाऊनलोड करु नये, तसेच कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये. अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांच्यावतीने शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
पेटीएम केवायसी अपडेट करावयाची आहे असे सांगून Any Desk , Quick Support, Team Viewer अशा प्रकारचे मोबाईलचा access घेणारे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून आपल्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन आपली आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. #fraud #Paytm #fraudtrend pic.twitter.com/shSMHvkwil
— Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) April 4, 2020