Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

जळगाव : जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रराज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेतया विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहेयाचे फलित म्हणून जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करणेसाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम देशाला घालून दिला आहे.
सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहेलाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ईपॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतातत्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुसया टोकास पिशवी लावणेस सांगितले जातेलाभार्थीनी पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतातहे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडतेयामुळे Social Distancing होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी फुट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहेलाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतातजळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहेत्या प्रतिबंध करण्यसाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहेतसेच नागरिकांनी या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्याही सुचना दिलेल्या आहेही बाब लक्षात घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ईपॅास उपकरणावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहेया निर्णयानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉअविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना दिल्यातजिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्यात्यानुसार मीच माझा रक्षक माणून सौसुरेखा महाले यांनी आपलीआपल्या कुटुंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत माहे एप्रिल 2020 चे धान्य वाटप  सुरू झाले आहेजिल्ह्यातील सर्व  1934 स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सूचना निर्गमित करणेत आल्या आहेतधान्य वाटप करतांना Social Distancing  चे पालन करावेगर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावीलाभार्थ्यांमध्ये किमान फूटाचे अंतर ठेवावेदुकानदारांनी वाटप करताना मास्कचा वापर करावातसेच धान्य वाटप करताना वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत आदी सूचना देणेत आल्या आहेतजिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार या सूचनांचे पालन करत असुन काही दुकानदारांनी  धान्य वाटप करणेसाठी अधिक खबरदारीचा उपाय योजल्याचे सौमहाले यांच्या कल्पनेवरुन लक्षात येते.
श्रीमती महाले यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत विचारले असताकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉअविनाश ढाकणेजिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशीतसेच तहसीलदार पाचोरापुरवठा अधिकारी आणि पुरवठा निरिक्षकपाचोरा यांनी केलेल्या आवाहनानुसार मीच माझा रक्षक माणून लाभार्थ्यांना काही अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केलाकाही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही  अभिनव कल्पना सुचल्याचे सौमहाले यांनी सांगितलेया उपक्रमासाठी पत्रापाईपएलबोरिबीट आणि स्टॅंड यासाठी रू. 945/- तर मजुरीसाठी रूपये 700/- असा एकूण 1645/- रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितलेश्रीमती सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या 20 वर्षापासुन स्वस्त धान्य दुकान चालवितातत्यांचेकडे एकूण 470 लाभार्थी असून हे लाभार्थी पण माझ्याच कुटूंबाचे घटक आहेत्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही सौमहाले यांनी सांगितलेमाझ्या या अभिनव उपक्रमाची जिल्हा प्रशासनाबरोबर शासनस्तरावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विशेष दखल घेतल्याने मी आनंदी आहे.
Exit mobile version