Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ च्या लढ्यात देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा भासू  नये, यासाठी नागरी उड्डयन मंत्रालय धोरण पातळीवर सातत्यानं प्रयत्न करत आहे.

कार्गो सेवेच्या माध्यमातून  आतापर्यंत औषधं , वैद्यकीय उपकरणं , कोविड -१९  चाचणी संच, मास्क, ग्लोव्हज  आणि अन्य साहित्य  देशाच्या विविध भागात पोहोचवली आहेत.

वैद्यकीय कार्गो सेवेसाठी लाईफलाईन उडान  नावाची  विशेष वेबसाईट तयार करण्यात आली असून, ती पूर्ण क्षमतेनं काम करत आहे.

शांघाय आणि नवी दिल्ली दरम्यान हवाई सेतू तयार करण्यात आला असून, चीनमधून वैद्यकीय उपकरणं घेऊन येण्यासाठी या मार्गाचा उपयोग होईल.

Exit mobile version