पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय
पुणे, दि.5: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 114 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 571 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 685 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 64 हजार 32 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 18 हजार 312 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील गरजू तसेच रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांकडून तसेच दानशूर व्यक्तींकडून दहा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.