Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याद्वारे शहरामध्ये कलम १४४ (१) (३) नुसार सोशल मीडियावर अफवा पसरवण्यांवर बंदी

पिंपरी : करोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सदर काळात काही समाज विघातक/गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरवत आहेत. तसेच करोना बाधित व्यक्तींची संख्या, त्याच्या वरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या, तसेच या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला परिसर वा संशयित करोना बाधित व्यक्ती याबाबत कोणत्याही खातरजमा न करता, अशी माहिती (बातमी) सोशल मीडिया, विविध प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अकारण भीती उत्पन्न होत असल्याचे जाणवत आहे.

या संदेश,अफवा किंवा बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याची क्षमता आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्याकरता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस उद्देशून काढणे आवश्यक असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप विष्णोई खात्री झाली आहे.

त्याअर्थी संदीप विष्णोई पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक 1/4/1974 च्या अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे दिनांक 5/4/2020 रात्री 12.01 ते दिनांक 30/4/2020 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करीत आहे.

Exit mobile version