मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे योगदान जमा केले.
अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट, माजी आमदार सीताराम घनदाट यांनी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला.