मुंबई : पंडिता रमाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सुधारणावादी विचारांचं व महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.
पंडिता रमाबाईंना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी या देशातील महिलांमध्ये सुधारणावादी विचार रुजवण्याचं, त्यांना स्वावलंबी करण्याचं काम पंडिता रमाबाईंनी केलं. महिलांनी शैक्षणिक, आर्थिक, वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी झालं पाहिजे यासाठी त्या आयुष्यभर काम करत राहिल्या. विधवा, परित्यक्ता महिलांसाठी त्यांनी त्या काळात उभारलेल्या संस्था व केलेलं काम हीच आपल्या सर्वांची प्रेरणा आहे.
जीवनाच्या अनेक क्षेत्रात आज आपल्या महिलांनी मिळवलेलं यश हे पंडिता रमाबाईंसारख्या व्यक्तिमत्वांनी त्या काळात रचलेल्या पायावर उभं आहे, याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे.