Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे वैद्यकीय संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी केला आहे.
जर हवेतून याचा प्रसार झाला असता तर रुग्णांनी ज्या हवेतून श्वास घेतला त्याच हवेतून इतर व्यक्ती, त्याचे कुटुंबीयही श्वास घेत होते. त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. किंवा हे रुग्ण रुग्णालयात दाखल झालेले होते तेव्हा ते ज्या हवेत श्वास घेत होते त्याच हवेत इतरही श्वास घेत होते. त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नसल्याचे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
Exit mobile version