जर्मनीसारखे  काही देश खादीचा ब्रॅण्ड म्हणून वापर करत असून, त्यांची उत्पादने विकत आहेत. जर्मनीमध्ये बेस्ट नॅचरल प्रॉडक्टस’ने (बीएनपी) युरोपीय संघ बौद्धिक संपदा कार्यालयाकडून ‘खादी ट्रेडमार्क’ची नोंदणी प्राप्त करुन घेतली असून, साबण, तेल इत्यादी उत्पादनांची विक्री ते करत आहे.

याविरोधात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आव्हान दिले होते, मात्र त्याला यश आले नाही. यासंदर्भातली कार्यवाही सुरु आहे.

‘खादी’ ट्रेडमार्क अंतर्गत आयोगाला यापूर्वीच जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि चीन या पाच देशात नोंदणी प्राप्त झाली आहे.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.