नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या स्थितीत आर्थिक ओढाताणीतून जाणाऱ्या सदस्यांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम राशी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठीही व्यवस्था करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओनं अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
सदस्यांना जन्मदिनांक दुरुस्त करण्याची सुविधा ऑनलाइन देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
यासंदर्भात संस्थेनं क्षेत्र अधिकाऱ्यांसाठी सुधारित सूचना जारी केल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांकाच्या माध्यमातून ईपीएफओ जन्मतारखेची पडताळणी करेल.