नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील, माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून, देशातल्या कोरोना प्रादुर्भावाविषयीच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली.
मोदी यांनी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग आणि अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मता बॅनर्जी, बीजु जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, डी.एम.केचे नेते एम. के. स्टॅलिन आणि अकाली दलचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.
याशिवाय प्रधानमंत्री येत्या बुधवारी संसदेतल्या सर्व पक्षनेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.