Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालीना जॉर्जीव्हा यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितल. मात्र तरीही त्वरित योग्य संतुलन साधणं अशक्य असल्याचं ते म्हणाले.

जगातली जवळजवळ अर्ध्याहून अधिक लोकसंख्या लॉकडाऊन मुळे  घरीच असल्याने अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version