Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरगुती मास्कचा वापर करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती  मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

जगभरात कित्येक देशात घरगुती मास्कचा उपयोग केल्याने त्याचा स्वतः ला आणि समाजाला फायदा झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय वैयक्तिक स्वच्छतेसाठीही हा उत्तम पर्याय आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनल्ड ट्रम्प यांनीही नागरिकांना घरगुती मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version