Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोविड -19 च्या स्क्रीनिंगसाठी रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी केल्याच्या 10 दिवसानंतर कोविड -19 वर चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जॉनसन यांचे वय 55 असून त्यांच्यामध्ये अद्यापही कोरोना विषाणूची लक्षणे दिसत आहेत, त्यानंतर जॉनसनच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला रुग्णालयात दाखल केले गेले.

शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना जॉनसन म्हणाले की, मला स्वत: ला आणखी काही दिवस वेगळ्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पंतप्रधानांना अद्याप ताप आहे, तो कोरोना विषाणूशी संबंधित एक लक्षण आहे आणि म्हणूनच मला आणखी काही दिवस एकटे रहावे लागेल.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉनसनच्या त्वरित बरे होण्सायाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रम्प यांनी रविवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतांना सांगितले की, “व्हायरसविरोधात वैयक्तिक युद्ध लढवणाऱ्या पंतप्रधान जॉनसनच्या आपल्या देशाच्या वतीने मी शुभेच्छा देतो.” ते नक्की बरे होतिल, यांच्यावर मला विश्वास आहे. ते एक अतिशय मजबूत व्यक्तिमत्व आहे.

Exit mobile version