नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत.
या काळात उद्भवलेली परिस्थिती पाहता, विद्यार्थी अभ्यासाच्या अधिक ताणात येऊ नयेत याबाबत काळजी घ्यायला हवी असं, आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी देशभरातल्या कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
स्थापन केलेले मदत संपर्क क्रमांक नियमित सुरु असतील आणि त्यासाठी नियुक्त केलेले समुपदेशक आणि शिक्षक त्यांची जबाबदारी पार पाडत राहतील याची नियमितपणे सुनिश्चिती करावी असा सल्लाही जैन यांनी दिला आहे.