Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांना मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावामुळे देशभरात लागु असलेल्या संचारबंदीच्या काळात देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांची माहिती आत्तापर्यंत मिळाली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

संचारबंदीमुळे देशाच्या विविध भागात अडकेल्या परदेशी पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्यासाठी सरकारनं www.strandedinindia.com हे संकेतस्थळ सुरु केलं असून, त्यावर गेल्या पाच दिवसांमध्ये या ७६९ परदेशी नागरिकांनी आपली माहिती दिली.

भारतात अडकलेले परदेशी पर्यटक मदतीसाठी या संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती नोंदवू शकतात.

Exit mobile version