Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू

१३ दिवसात १,४२९  गुन्ह्यांची नोंद

मुंबई : कोरोना विषाणूमुळे २४ मार्च २०२० पासून  महाराष्ट्र तसेच संपूर्ण देश पूर्णतः लॉक डाउन झालेला आहे. राज्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियंत्रणात्मक कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री  दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेले असून गेल्या १३  दिवसात  १,४२९ गुन्ह्यांची नोंद  करण्यात आली आहे.

राज्यातील  सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी मोहीम सुरू असून दि.२४ मार्च ते दि.०५ एप्रिल २०२० या कालावधीत खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 

कालावधी नोंदविण्यात

आलेले गुन्हे

अटक 

आरोपी

जप्त मुद्देमालाची 

एकूण किंमत

दि.05-04-2020 62 29 रु.8,11,216/-
दि.24-03-2020 ते

दि.05-04-2020

1429 541 रु.3,43,95,458/-

 

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३

व्हाट्सअॅप क्रमांक – ८४२२००११३३.

ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.

वरील क्रमांकावर अवैध मद्यसंबंधी तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version