नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ३० हजाराची पातळी तीनआठवड्यांनंतर आज पुन्हा गाठली. २ हजार ४७६ अंकांनी वधारून हा निर्देशांक ३० हजार६७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ७०८ अंकांनी वधारून ८हजार ७९२ वर स्थिरावला.
जगभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांमध्ये तुलनेनेझालेली घट आणि जगभरातल्या बाजारात झालेल्या वाढीमुळे देशातले शेअर बाजारवधारल्याचे विश्लेषकांनी सांगितले. ऊर्जा, बँका, तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहनउद्योग यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले.