Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे :  कोरोना विषाणूंचा ( COVID – 19) प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच जिल्हयात अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सुचना निर्गमित करण्यात आलेल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

पुणे महानगर विकास क्षेत्रात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता, शासकीय कार्यालयांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच या क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणा-या सर्व अभ्यागतांनादेखील चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version