Site icon साप्ताहिक एकच ध्येय

“श्री फाउंडेशन”च्या वतीने ग्लुकोज व मास्कचे वाटप

पिंपर : “श्री फाउंडेशन”च्या वतीने दिवस-रात्र एक करून आपल्याला करोना मुक्तत ठेवण्याचा प्रयत्न व विना कारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना (त्याच्या चांगल्यासाठी/हितासाठी) घरात बसून रहा, असे आवाहन करीत असणारे पोलिस बंधु आणि स्थानिक नागरिकांना तसेच गरजु पिडीतांना, अन्न -धान्याचा पाठपुरवठा करणार्‍या “अन्न, नागरी पुरवठा, विभागाचे आधिकारी/स्टाफ” भर उन्हात थाबून /धावपळ करून आपली कामे बजवत आहेत. त्या पोलिसांसाठी व “अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या” आधिकारी आणि स्टाफ यांच्यासाठी एक हात मदतीचा म्हणुन “ग्लुकोज” व “मास्कचे” वाटप करण्यात आले. यावेळी एकूण 390 (कमिशनर ऑफीस – पासपोर्ट विभाग, चिंचवड पोलिस स्टेशन, वाकड पोलिस स्टेशन, आदित्य बिर्लासमोर कार्यरत असणारे पोलिस, चाफेकर चौक व डांगे चौक कार्यरत असणारे पोलिस/ट्राफिक पोलिस, संभाजी चौक पेट्रोल पंप जवळ कार्यरत असणारे पोलिस आणि अन्न, नागरी पुरवठा विभाग, निगडी) लोकांना ग्लुकोज व मास्कचे वाटप करण्यात आले.

तसेच कोरोना जंतू संसर्गजन्य परिस्थितीमुळे, उद्धभवलेल्या परिस्थितीमुळे अनेक जणांवर वाईट वेळ आली आहे. गरीब लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी म्हणुन या परिस्थितीशी लढण्यासाठी आपण दररोज काम करून आपले पोट भरणारे 30 मजदूर पिडीतांना दररोज 2 वेळच जेवण देऊन मदत करण्यात येत आहे. (7/4/20 ते लाॅकआऊट संपेपर्यंत) यासाठी श्री. पुडंलिक मते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी “श्री फाउंडेशनचे” श्री. सुशांत पांडे (संस्थापक/ अध्यक्ष), श्री. संदिप शिंदे (सल्लागार) , श्री. कालिदास वाडघरे, कु. प्रशांत जाधव, कु. आकाश मिश्रा, तसेच “अन्न, नागरी पुरवठा विभागाचे” श्री. दिनेश तावरे (नायब तहसीलदार), श्री. हेमंत भोकरे (सहाय्यक परिमंडळ अधिकारी, विभाग), श्री. तुषार नावडकर (पुरवठा निरीक्षक, पिंपरी), सौ. भावना वानखडे (आस्थापना लिपिक ज विभाग), सौ. रुचिता शेघर (आस्थापना लिपिक विभाग), सौ. देशपांडे (शिपाई), श्री. गणेश सोनवणे, संदीप मोरे, युसुफ शेख व इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री. दिनेश तावरे (नायब तहसीलदार) यांनी “श्री फाउंडेशन” व यासारख्या काही सामाजिक संस्था आपल्या परिसरात चांगले काम करित आहे, असे स्तुती केली.

Exit mobile version