स्थानिक उद्योग, इ कॉमर्स कंपन्या, व्यक्ती देखील पार्सल पाठवू शकतील
नवी दिल्ली : देशातल्या पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मालवाहू गाड्यांच्या विनाअडथळा प्रवासासाठी एक विशेष वेळापत्रक तयार केले आहे. याद्वारे, देशभर, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत आणि जलद होऊ शकेल. यामुळे, सर्वसामान्य जनता, उद्योग आणि कृषीक्षेत्राला मालाचा पुरवठाही लवकर होण्याची अपेक्षा आहे.
या वेळापत्रकानुसार, पार्सल ट्रेनसाठी 58 मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यावर 109 गाड्या धावू शकतील. पाच एप्रिलपर्यंत यातील 27 मार्ग अधिसूचित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 40 नवे मार्ग निश्चित करण्यात आले असून, आधीच्या मार्गावरची वाहतूक देखील वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील सर्व महत्वाची शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत, भविष्यात ही सेवा वाढवली जाऊ शकते.
ग्राहकांच्या मागणीनुसार या गाड्यांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. या गाड्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, गुवाहाटी आणि बंगरूळू या प्रमुख शहरांना जोडतील.
या शहरांमध्ये महाराष्ट्रातील, नाशिक, नागपूर, अकोला, जळगाव, पुणे या शहरांचा समावेश आहे. :
ग्राहकांच्या मागणीनुसार, रेल्वे विभाग वस्तू किंवा उत्पादनांच्या विशेष पार्सल ट्रेन सोडणार आहे, यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अन्नधान्य यावर विशेष भर देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पार्सल गाड्यांचे महाराष्ट्रातील वेळापत्रक पुढीलप्रमाणे
LIST OF ROUTES
S.No. | FROM | TO | Parcel Train No. |
मध्य रेल्वे | |||
1 | छत्रपती शिवाजी टर्मिनस | नागपूर | 00109 |
नागपूर | छत्रपती शिवाजी टर्मिनस | 00110 | |
2 | छत्रपती शिवाजी टर्मिनस | वाडी | 00111 |
वाडी | छत्रपती शिवाजी टर्मिनस | 00112 | |
3 | छत्रपती शिवाजी टर्मिनस | शालीमार | 00113 |
शालीमार | छत्रपती शिवाजी टर्मिनस | 00114 | |
4 | छत्रपती शिवाजी टर्मिनस | Madras | 00115 |
मद्रास | छत्रपती शिवाजी टर्मिनस | 00116 | |
5 | चांग्सरी | कल्याण | 00104 |
या ट्रेनद्वारे मालवाहतूक करण्याची सुविधा कोणत्याही व्यक्तीला अथवा आस्थापनेला मिळू शकेल. सध्या आवश्यकतेनुसार, पुढील वस्तूंची वाहतूक देशाच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे.
i. भाज्या, फळे, अंडी, मासे अशा नाशिवंत वस्तू. Perishables (including eggs, fruits, vegetables, fish)
ii. औषधे, वैद्यकीय उपकरणे, मास्क
iii. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
iv. कृषीसाठी बियाणे
v. इतर किराणा माल आणि वस्तू इत्यादी
या गाड्यांना शक्य तेवढ्या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त पार्सल एका दिवसात पोचते व्हावेत