नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोविड -19 विरुद्धच्या लढाईत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, अशा प्रकारच्या अनपेक्षित वेळा मित्रांना जवळ आणतात. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा निश्चितच आता अधिक मजबूत आहे. भारत मानवतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
Fully agree with you President @realDonaldTrump. Times like these bring friends closer. The India-US partnership is stronger than ever.
India shall do everything possible to help humanity's fight against COVID-19.
We shall win this together. https://t.co/0U2xsZNexE
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2020