पुणे : जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकित कायद्यातील तरतुदीनूसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कौशल्यध विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
मार्च 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,481, रास्ता पेठ,पुणे या कार्यालयाव्दारे चालू असून, या सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव, या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 ही आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे, तव्दतच प्रत्येक आस्थापनेने आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा.
या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी punerojgar@gmail. com /asstdiremp.pune@ese.maharashtra.gov.in यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणांस या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्रीमती पवार यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.