Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक ५९ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डींग (वरिष्ठ) स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स यांचे मान्यतेने व पिंपरी चिंचवड अँमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांचे सहकार्याने दि. २५/६/१९ ते २९/६/१९ या काळात प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक ५९ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डींग (वरिष्ठ) स्पर्धेचे उद्घाटन महापौर राहूल जाधव यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतीक समिती सभापती तुषार हिंगे,  नगर सदस्य बाबा त्रिभुवन, राजू मिसाळ, शीतल शिंदे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशा राउत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अनिता केदारी, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन चे सचिव संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे राजेंद्र साजपुरकर, अँमेच्युर बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत हे उपस्थित होते.

या स्पर्धेत ३०० परूष व महिला खेळाडूंनी आपापल्या राज्यांच्ये प्रतिनिधित्व करत विविध वजन गटात सहभाग नोंदविला आहे.

प्रत्येक वजन गटातील बेष्ट सिक्स (उत्कृष्ट सहा) बिल्डर्स निवड समितीकडून निवडले गेले. त्यांची अंतिम स्पर्धा दि. २९/०६/१९ रोजी होईल.

    सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीम. जयंश्री साळवी यांनी केले. स्पर्धेचे कामकाज स्पर्धा प्रमुख अनिल मगर, रंगराव कारंडे, बन्सी आटवे, लक्ष्मण माने, भाउसाहेब खैरे यांनी पाहिले.

Exit mobile version