मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप बँक लि., मुंबई, या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अग्रगण्य बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता COVID-19 या निधीस रुपये 5 लाख इतकी मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला.
रुपये 5 लाख रकमेचा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना बँकेचे अध्यक्ष प्रमोद बा.पंडित व उपाध्यक्ष भारत वा.वानखेडे यांनी सुपूर्द केला. याप्रसंगी संचालिका पुजा भा.उदावंत, संचालक भगवान पां.पाटील, समीर वि.तुळसकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद भा.महाजन उपस्थित होते.