Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मजबूत, समावेशक संस्कृती आणि एकता आणि एकात्मतेमुळे भारताने दहशतवाद आणि मानवतेच्या इतर शत्रूंवर केली मातः अल्पसंख्याक मंत्री

मुंबई : बहुसंख्य हिंदू समुदायाच्या एकात्मता आणि सहिष्णुतेच्या संस्कृतीमुळे भारताच्या लोकतांत्रिक धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला आहे आणि या पायाला मजबूत केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. हज हाऊसच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे नक्वी यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भारत जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष- लोकशाही देश आहे तर दुसरीकडे फाळणीनंतर पाकिस्तानने इस्लामी राष्ट्र बनणे पसंत केले, भारतातील बहुसंख्य हिंदू समुदायाने मात्र धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला, असे श्री नक्वी म्हणाले. अनेक भाषा, पंथ, खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या पद्धतीमध्ये  विविधता असूनही भारतीय संस्कृतीने आपल्याला एकतेच्या मजबूत धाग्याने एकसंध राखले आहे. भारतातील अल्पसंख्याक समाज धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासह विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

मजबूत, समावेशक संस्कृती आणि एकता आणि एकात्मतेमुळे भारताने दहशतवाद आणि मानवतेच्या इतर शत्रूंवर मात केली असे अल्पसंख्याक व्यवहारमंत्री म्हणाले. आपल्या समाजातील एकतेच्या बांधिलकीमुळे अल कायदा आणि आयएस यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांना त्यांचे सैतानी मनसुबे प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नाही. दहशतवाद हा संपूर्ण मानवता आणि इस्लामचा सर्वात मोठा शत्रू आहे याची भारतातील मुस्लीम समुदायाला पुरेपूर जाणीव आहे.

समावेशक विकास आणि एकात्मतेचे वातावरण कोणत्याही नकारात्मक अपप्रचारामुळे दूषित होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, अशी सूचना नक्वी यांनी केली. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीला आपण आपले सकारात्मक सामर्थ्य बनवले पाहिजे आणि त्याला नकारात्मक दुबळेपणा बनवता कामा नये, असं त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही अनुदानाशिवाय विक्रमी दोन लाख भारतीय मुस्लीम यावर्षी हाज यात्रेला जात आहेत, असे नक्वी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकसित केलेल्या प्रामाणिक आणि पारदर्शक प्रणालीमुळे हज अनुदान बंद केल्यानंतरही हज यात्रेकरूंवर कोणताही अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली.

देशभरात सुमारे 21 प्रस्थान स्थळांवरून 500हून अधिक विमान उड्डाणांच्या माध्यमातून विक्रमी दोन भारतीय मुस्लीम यावर्षी हज यात्रेला जात आहेत, याकडे नक्वी यांनी लक्ष वेधले. भारतीय हज समितीच्या माध्यमातून एक लाख 40 हजार हाज यात्रेकरू जातील, तर हज ग्रुप ऑर्गनायजर्स(एचजीओ) च्या माध्यमातून 60 हजार यात्रेकरू जाणार आहेत. सर्व एचजीओंना दहा हजार हज यात्रेकरुंना भारतीय हज समितीने निर्धारित केलेल्या दरानेच न्यावे लागेल.

हज यात्रेकरूंना सोयीचे व्हावे आणि पारदर्शकता राखली जावी यासाठी एचजीओंचे  http://haj.nic.in/pto/ (Portal For Haj Group Organisers) हे पोर्टल तयार करण्यात आले आहे, अशी माहिती नक्वी यांनी दिली. या पोर्टलवर एचजीओ आणि त्यांची पॅकेजेस असा सर्व तपशील या पोर्टलवर उपलब्ध आहे. एकूण 725 एचजीओ यावर्षी हाज यात्रेकरूंना घेऊन जाणार आहे.

“मेहरम” (पुरुष सोबती) शिवाय जाणाऱ्या महिला हज यात्रेकरूंची संख्या यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे, असे नक्वी म्हणाले. गेल्या वर्षी भारतातून मेहरम शिवाय 1180 मुस्लीम महिला हज यात्रेला गेल्या होत्या, यावर्षी 2340 मुस्लीम महिला हज यात्रेला जातील, असे त्यांनी सांगितले.यावर्षी देखील या महिलांना सोडत पद्धतीशिवाय हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था अल्पसंख्याक व्यवहारमंत्र्यांनी केली आहे. दोन लाख हज यात्रेकरूंमध्ये महिलांचे प्रमाण 48 टक्के आहे.

हज 2019 साठी 4 जुलै 2019 पासून विमान उड्डाणे सुरू होणार आहेत. चार जुलैला दिल्ली, गया, गुवाहाटी आणि श्रीनगरहून विमान उड्डाणे सुरू होतील. हाज यात्रेकरू बंगळुरूहून( 7 जुलै), कालिकतहून( 7 जुलै), कोचीन (14 जुलै),  गोवा( 13 जुलै), मंगलोर( 17 जुलै), मुंबई(14 आणि 21 जुलै), श्रीनगर( 21 जुलै) रोजी जातील.

दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद( 20 जुलै), औरंगाबाद( 22 जुलै), भोपाळ(21 जुलै), चेन्नई( 31 जुलै), हैदराबाद (26 जुलै), जयपूर( 20 जुलै), कोलकाता( 25 जुलै), लखनौ( 20 जुलै), नागपूर(25जुलै), रांची(21 जुलै) आणि वाराणसी(29 जुलै) ही विमान उड्डाणे होणार आहेत

Exit mobile version