Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मिळणार

अहमदनगर : जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून, 2020 या 2 महिन्याच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील एकूण 3 लाख 32 हजार 024 एवढ्या पात्र शिधापत्रिकेमधील 14 लाख 90 हजार 17 एवढ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे वितरण मे आणि जून या महिन्यासाठी असल्याने या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकानसमोर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिनांक 31 डिसेंबर, 2019 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना देय धान्याचा कोठा हा मे महिन्याकरीताचा असल्याने अशा पात्र लाभ्यार्थ्यांनी माहे एप्रिल, 2020 मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे गर्दी करु नये अथवा याबाबतच्या चौकशीसाठी स्वस्त धान्य दुकानदाराकई़े आताच संपर्क साधू नये. देय धान्याचा कोठा हा 1 मे. 2020 पासून वितरीत करण्यात येणार आहे.

Exit mobile version