नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं असून याबाबत स्त्रियांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं 7217735372 हा व्हाट्सअँप क्रमांक जारी केला आहे.
आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. अशी प्रकरणं आपल्या आजूबाजूला आढळली तर या क्रमांकावर मेसेज करून माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यंत केवळ ई मेलच्या माध्यमातून ६९ तक्रारी दाखल झाल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे.