नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्यावर मतं जाणून घेण्यासाठी ही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही दुसरी बैठक आहे. अनेक राज्य सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यास अनुकूल असल्यानं, हा कालावधी वाढवला जाण्याचे संकेत असल्याचं वृत्त आहे.