Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
या निर्णयानुसार मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह,  येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, आणि कल्याण जिल्हा कारागृह  ही कारागृहं लॉकडाऊन केली आहेत. या कारागृहांच्या  अधिक्षकांनी कारागृहात अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन पाळ्यांमध्ये  करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन आणि  निवासाची व्यवस्था आतच करावी. मुख्य प्रवेशद्वार  लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे आदेश सरकारनं दिले आहेत.
Exit mobile version