Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ कडून मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी १ लाख ७५ हजार ८११ रुपयांची मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या पत्नींची संघटना असलेल्या ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ कडून मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी १ लाख ७५ हजार ८११ रुपयांची मदतीचा धनादेश दिला.

गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

Exit mobile version