Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

ही खरेदी सुरु करताना, खरेदी केंद्रावर कामगारांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी  उपाययोजना करावी. कामगारांनी सामाजिक अंतर राहील याबाबत  दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

Exit mobile version