सर्व खादी ग्रामोद्योग केंद्रांनी 500 मास्क जिल्हाधिकाऱ्यांना मोफत देण्याचे खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षांचे आवाहन
नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) मोठ्या प्रमाणावर दोन-पदरी खादीचे मास्क विकसित करण्यात यश आले असुन मोठ्या प्रमाणावर त्याचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी मागणीची पूर्तता करण्यास होकार दिला आहे. या यशात भर घालणारी बाब म्हणजे, नुकतीच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला, जम्मू आणि काश्मिर सरकारकडूनही 7.5 लाख खादीचे मास्क पुरविण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे, ज्यात केवळ 5 लाख मास्क जम्मू जिल्ह्यासाठी, एक लाख चाळीस हजार पुलवामा जिल्ह्यासाठी, एक लाख उधमपूर जिल्ह्यासाठी आणि 10,000 कुपवाडा जिल्ह्यासाठी आहेत. हे मास्क 20 एप्रिलपर्यंत जिल्ह्याच्या विकास आयुक्तांना मदत म्हणून पाठविण्यात येणार आहेत. कापडी पुनर्वापर करता येण्यासारखे, हे मास्क तीन पदरांसह 7 इंच (लांबी) आणि 9 इंच (रूंदी) आणि चार बंद असलेले आहेत.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष व्ही. के. सक्सेना म्हणाले की, केव्हीआयसी हेतूपूर्वक दोन घड्या असलेले खादी कापडाच्या मास्कचे उत्पादन करीत आहे. हा मास्क आतल्या बाजूला 70 टक्के ओलावा टिकवून ठेवतो, शिवाय हवा खेळती राहण्यासाठी यात पुरेशी जागा आहे, म्हणून अगदी सहज उपलब्ध होणारे, पाकिटात ठेवता येण्याजोगे हे पर्यायी मास्क आहेत.
सध्या, जम्मू जवळ असलेल्या नागरोट्टा या खादी शिलाईचे केंद्राचे रूपांतर मास्क शिलाई केंद्रामध्ये झाले आहे, जे प्रति दिन 10,000 मास्कचे उत्पादन करीत आहे, तर बाकीच्या शिल्लक ऑर्डर्स श्रीनगर आणि आसपासच्या स्वयंसहायता गट (एसएचजी) आणि खादी संस्था पूर्ण करीत आहेत.
एक मीटर खादीच्या कापडात दोन-पदर असलेले 10 मास्क तयार होऊ शकतात. 7.5 लाख मास्क बनविण्याच्या ऑर्डरसाठी 75,000 मीटर खादीचे कापड वापरले जाईल, त्यामुळे खादी कारागीरांच्या रोजगारांच्या संधीमध्ये आणखी वाढ होणार आहे. जसे की जम्मू आणि काश्मिर संस्थांमधून केवळ लोकरीच्या धाग्यांचे उत्पादन होतात. आणि मास्कसाठी लागणारे सुती धागे हे हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील खादी संस्थांमधून खरेदी केले जातात आणि जिल्हा अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेऊन त्यांना पाठविले जातात.
दरम्यान, देशभरातील स्थानिक प्रशासनास पाठिंबा देण्यासाठी, सर्व खादी संस्थांनी पुढील वितरणासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना किमान 500 मास्क मोफत उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या 2400 सक्रीय खादी संस्थांमधून या कार्याद्वारे देशभरामध्ये 12 लाख मास्क उपलब्ध केले जातील. या आवाहनानंतर, अनेक खादी संस्थांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 500 मास्क उपलब्ध करून दिले आहेत. श्री सक्सेना पुढे म्हणाले, “मास्क हे कोरोना साथीच्या आजाराशी लढण्यासाठी सर्वात महत्वाचे साधन आहे. भारतासाठी एकमेव पर्याय असलेले हे मास्क डीटी फॅब्रिकपासून तयार केलेले आहेत, तसेच ते वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांशी तंतोतंत जुळत असून मागणी उत्तम दर्जानिशी पूर्ण करू शकतील.”