Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यावर अतिशय उच्च स्तरावरून नियमित देखरेख केली जात आहे आणि त्यांचा आढावा घेतला जात आहे

नवी दिल्ली : देशातील सर्व सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 च्या चाचण्यांच्या क्षमतेत तातडीने वाढ करण्यासाठी, देशभरातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये ही जबाबदारी समप्रमाणात विभागून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संस्था वैद्यकीय महाविद्यालयांसाठी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम करतील आणि संबंधित राज्यांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्रांची स्थापना करण्याला मदत करतील, अशी अपेक्षा आहे. या सर्व संस्थांना संबंधित राज्य सरकारांशी योग्य समन्वय राखून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

कालपासून देशभरात पुष्टी झालेल्या 909  कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. 716 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे आणि आतापर्यंत 273 मृत्यूंची नोंद झाली आहे.

समर्पित रुग्णालये, अलगीकरण खाटा, आयसीयू खाटा आणि विलगीकरण सुविधा यांचा समावेश असलेल्या प्राथमिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ करण्यावर देखील सरकार भर देत आहे.

12.04.2020 रोजी 8356 रुग्णांसाठी अंदाजे 1671 खाटांची ( मध्यम आणि तीव्र/गंभीर लक्षणे असलेल्या पुष्टी झालेल्या रुग्णांच्या 20% ) गरज होती, तर देशभरातील 601 समर्पित कोविड-19 रुग्णालयांमध्ये 1,05,980 खाटा उपलब्ध आहेत. समर्पित रुग्णालयांमधील अलगीकरण खाटांच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येत आहे.

कोविड-19च्या रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी देशभरात समर्पित रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येत आहे.

सरकारी रुग्णालयांसोबतच खाजगी रुग्णालये, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, लष्करी रुग्णालये, भारतीय रेल्वे देखील या प्रयत्नांमध्ये योगदान देत आहेत. दारुगोळा कारखाना मंडळाने दुर्गम भागात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विशेष प्रकारच्या तंबूंची निर्मिती केली आहे.

सर्व प्रकारच्या सज्जतेसाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून एम्स, एनआयएमएचएएनएस यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या  वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही भर दिला जात आहे. व्हेंटिलेटर व्यवस्थापन, वैद्यकीय व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध/ नियंत्रण, जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि साथरोगशास्त्र यांच्या संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण मॉड्युल आणि वेबिनारचे आयोजन या संस्थांकडून करण्यात येत आहे. आघाडीवरच्या वैदयकीय कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्यासाठी मॉक ड्रिलचे देखील आयोजन करण्यात येत आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या.

https://www.mohfw.gov.in/

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19@gov.in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019@gov.in . या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी  या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

Exit mobile version