Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंतप्रधान जनौषधी केंद्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धे-मांडवीय

नवी दिल्ली : सध्याच्या आपत्कालीन काळात पंतप्रधान जनौषधी योजनेतील (PMJK) कर्मचारी कोरोना विरोधात धीरोदात्तपणे लढत देशाचे रक्षण करत आहेत, असे केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.

देशभरातील 6300 जनौषधी केंद्रांत परवडणारी औषधे उपलब्ध आहेत,अशी माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

देशभरातल्या गोदामांमधून युध्दपातळीवर, दिवसरात्र औषधे पोचवण्याचे काम सुरू असल्याचेही ते पुढे म्हणाले.

 

लॉकडाऊनच्या कालावधीत,कोविड-19 च्या महामारीत,संपूर्ण देशभरातील,प्रशिक्षित औषधविक्रेते,पंतप्रधान जनौषधी योजनेद्वारे, परवणारी उत्तम दर्जाची औषधे सामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम करीत आहेत.

726 जिल्ह्यात, 6300 जनौषधी केंद्रे (PMJAK) कार्यरत आहेत.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परीयोजना(PMBJP),ही परवडणारी औषधे,वाजवी किंमतीत गरजूंना पुरवणारी योजना असून, केंद्र सरकारच्या ,रसायने आणि खते ,या मंत्रालयाच्या औषध विभागातर्फे ही योजना राबवली जाते.

या औषधांचा पुरवठा करण्यासाठी गुरगाव येथे, एक मध्यवर्ती प्रादेशिक स्तरावर, गुवाहाटी आणि चेन्नई येथून  प्रत्येकी एक (मिळून 2), तर इतर काही ठिकाणी 50 इतकी केंद्रे पूर्ण क्षमतेने यासाठी कार्यरत आहेत. या औषधांचा पुरवठा करण्यासाठी विशेष क्षमतेचे  SAP विक्री साँफ्टवेअर विकसित करण्यात आले असून त्या द्वारे सर्वत्र पुरवठा होत आहे. नागरिकांना आपल्या परीसरातील जवळचे जनौषधी केंद्र माहीत होण्यासाठी “जनौषधी सुगम” ॲपही सुरू करण्यात आले आहे, त्यावर केंद्राचे स्थान, औषधांच्या किंमती आणि उपलब्धता देखील पहाता येईल. गूगल ॲप स्टोअर, आणि आयफोन स्टोअर वरून हे अँप डाऊनलोड करता येईल.

लॉकडाऊनच्या कालावधीत, प्रधानमंत्री जनौषधी परीयोजनेद्वारे लोकांना कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या माहितीपूर्ण पोस्ट्स्ही सामाजिक माध्यमांतून जनजागृतीसाठी तयार केल्या आहेत. ही सर्व माहिती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर @pmbjpbppi या लिंकवर प्राप्त होईल.

Exit mobile version