नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संक्रमित रूग्णांची वाढती संख्या पाहता सरकार आणखी कठोर बनले आहे. दिल्ली सरकारने कित्येक भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले. दिल्लीतील कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या 43 झाली. शनिवारी दिल्लीत कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या 33 होती.
रविवारी मदनपूर खादर, अबुल फजल एन्क्लेव, कैलासच्या पूर्वेकडील, खड्डा कॉलनी जैतपूर विस्तार, बंगाली कॉलनी, महावीर एनक्लेव, शेरा मोहल्ला गढी या नवीन भागांना सील ठोकण्यात आले.