Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम तीव्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची आणि त्यांचे विलगीकरण करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज दिले. या आदेशांच्या अंमलबजावणीचे अधिकार आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन हे विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या संबंधित पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर विलगीकरण करताना ‘स्वतंत्र खोलीत एक व्यक्ती’ अशी व्यवस्था संबंधित व्यक्तींच्या घरी सोय होत असल्यास तिथेच करावी, अन्यथा अन्यत्र संसर्गाचा प्रतिबंध होऊ शकेल अशा ठिकाणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Exit mobile version