Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २९ हजार कोटी रुपये जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं ३२ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून २९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. यांपैकी १५ हजार कोटी रुपये प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात, तर १० हजार कोटी रुपये प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत येत असलेल्या महिला खातेधारकांच्या खात्यात आणि ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम, बांधकाम मजुरांच्या खात्यात, तसंच १ हजार ४०० कोटींहून अधिक रक्कम दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांच्या खात्यात जमा केली आहे.
कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही मदत योजना जाहीर केली होती.
Exit mobile version